
सामना प्रतिनिधी, मुंबई
मलबार हिल येथे दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुचाकीवर मागे बसलेला गंभीर जखमी झालेला असतानाही त्याला त्याच अवस्थेत सोडून चालकाने पळ काढला. मलबार हिल पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दिनेश निवडेकर (48) हे त्यांच्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होते.रविवारी दुपारी सवाचारच्या सुमारास वेगात असलेली दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने नेपयन्सी रोड येथील रस्ता दुभाजकावर आदळली. त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेले निवडेकर रस्त्यावर पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. मात्र असे असतानाही चालक निवडेकर यांना कोणतीही वैद्यकीय मदत न देता, तसेच पोलिसांना न कळवता तेथून पळून गेला. परिणामी गंभीर जखमी निवडेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
summary- one died in malbar hill






















































