
लातूर -नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रेड्डी पेट्रोल पंपाजवळ दुचाकी व आयशर टेम्पो यांच्यात बुधवारी संध्याकाळी जोरदार धडक झाली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. धोंडीराम पळनाटे (57) असे मृताचे नाव आहे.
धोंडीराम हे व्हटी मध्यम प्रकल्प कार्यालयात अभियंता म्हणून कार्यरत होते. दरम्यान याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

































































