सामना ऑनलाईन । उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 3 जण ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मधील मेमसाब या इमारतीचा स्लॅब कोसळला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. मेमसाब इमारतीच्या तळमजल्यावर दवाखाना असून पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…






























































