चाकूर तालुक्यातील मोहनाळमध्ये एकाचा निर्घूण हत्या; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाकूर तालुक्यातील मोहनाळ येथील शिवारात चाळीस वर्षांच्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्याचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने ही घटना उघडकीस आली आहे. अद्याप आरोपीचा काही सुगावा लागला नसून अज्ञात व्यक्तीविरोधात चाकूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहे.

मोहनाळ येथील शिवारात एका 40 वर्षांच्या व्यक्तीचा अज्ञातांनी खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली असून मृत व्यक्ती अहमदपूर येथील अंकुश देवराव डावरे ( 40) हे साठे नगर येथील असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या डोक्यात मारुन, विवस्त्र करून व मारहाण करुन मोहनाळ शिवारात मृतदेह टाकण्यात आला होता. मृत व्यक्ती अंकुश डावरे घरणी येथे लग्नासाठी आले होते. त्यानंतर अहमदपूर या आपल्या गावी परत जाण्यासाठी निघाले होते. मात्र, ते घरणीला पोहचलेच नाही. अखेर त्यांची हत्या झाल्याची माहिती मिळाली, असे नातेवाईकांनी सांगितले.

ही हत्या कोणी आणि का केली, याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात अरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.पोलीस अरोपीचा शोध घेत आहेत.