टीआरपी प्रकरणात आणखी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी प्रकरणात अभिजित भजनदास कोलवडे उर्फ अमित हे आज मुंबई क्राईम ब्रँचसमोर शरण आले. शरण येताच पोलिसांनी त्याला अटक केली. तर महामुवीचे सीईओ संदीप वर्मा आणि अमित दवे यांना क्राईम ब्रँचने चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत.

मुंबई क्राईम ब्रँचने टीआरपी प्रकरणात आता पर्यंत 9 जणांना अटक केली. क्राईम ब्रँचच्या कोठडीत असलेल्या रामजी वर्मा आणि दिनेश विश्वकर्माच्या चौकशीत हरिषचे नाव आले होते. हरिषला देखील क्राईम ब्रँचने पवई येथून अटक केली. हरिषच्या चौकशीत अभिजितचे नाव समोर आले. अभिजित हा हरिषच्या संपका&त होता. पोलिसांना अभिजित बाबत माहिती मिळाली. तो स्वतŠची ओळख खोटी सांगून देशभरातील महामार्गानजीकच्या हॉटेलामध्ये राहायचा. त्याने चार वर्षांपूर्वी एका मृत व्यक्तीच्या नावावर मोबाईल देखील घेतला होता. तर रामजी, उमेश आणि अभिषेक हे देशभरातील काही ठिकाणी एकत्र गेले होते.

अभिजितच्या शोधासाठी सीआययूचे पोलीस निरीक्षक सचिन वाझे, युनिट 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदपुमार गोपाळे यांच्या पथकातील पोलिसासह युनिट 11 चे एपीआय पाटील, जाधव, आणि प्रॉपर्टी सेलचे खानोरे यांचे पथक तीन राज्यात गेले होते. शोध मोहीम सुरु असतानाच आज अभिजित हे त्याचे वकील के. एच. गिरी यांच्यासोबत क्राईम ब्रँचच्या ऑफीसला आले. अभिजित हे पोलिसांना शरण जाताच पोलिसानी त्याला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस अभिजित आणि रामजी, दिनेशची समोरासमोर बसवून चौकशी करणार आहेत.