घरफोडी करणाऱ्या सराईताला अटक; गुन्हे शाखेची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या अट्टल सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केली. त्याच्याकडून 4 लाख 13 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रोहित नानाभाऊ लंके (वय 21 रा. विश्रांतवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणारा सराईत मंगळवार पेठेत येणार असल्याची माहिती पोलीस अमंलदार गजानन सोनुने आणि कादिर शेख यांना मिळाली. त्यानुसार युनीट दोनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून रोहित लंके याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणून 4 लाख 13 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, गजानन सोनुने, अजित फरांदे, कादीर शेख, किशोर वग्गू, संजय जाधव, चेतन गोरे, गोपाल मदने, अस्लम पठाण, समीर पटेल, निखील जाधव, उत्तम तारू, अरूणा शिंदे यांच्या पथकाने केली.

कटावणीच्या साह्याने घरफोडी
बंद घराची पाहणी करून सराईत रोहित लंके कटावणीच्या साह्याने कडी-कोयंडा तोडून घरफोडी असल्याचे उघडकीस आले आहे. त्याने आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असल्यामुळे तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.