मौजमजेसाठी वृद्धेची सोनसाखळी चोरणारा अटकेत; खंडणी विरोधी पथक -1 ची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मौजमजा करण्यासाठी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणाऱ्या चोरट्याला खंडणी विरोधी पथक एकने कर्वेनगर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून सोनसाखळी आणि मोटार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रविण मधूकर डोंगरे (वय 23, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

जेष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणारा चोरटा कर्वेनगरमधील शाहू कॉलनीत आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून प्रवीण डोंगरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने 1 ऑगस्टला गिरीजा शंकर सोसायटी परिसरातून जाणाऱ्या वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, एपीआय अभिजीत पाटील, उपनिरीक्षक विकास जाधव, नितीन कांबळे, गजानन सोनवलकर, राजेंद्र लांडगे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, विजय कांबळे यांनी केली.