फ्रेंच ओपनसाठी एक हजार टेनिसप्रेमींना परवानगी, क्रीडामंत्री जीन मायकेल ब्लॅनक्वेर यांच्याकडून संकेत

कोरोनामुळे गेल्या वर्षी लाल मातीवर खेळवण्यात येणारी फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा उशिरा खेळवण्यात आली. यंदा मात्र फक्त एक आठवडय़ाच्या विलंबाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. पण रोलॅण्ड गॅरोसमधील प्रमुख तीन कोर्टवर प्रत्येकी एक हजार टेनिसप्रेमींनाच परवानगी देण्यात येणार आहे, असे संकेत क्रीडा मंत्री जीन मायकेल ब्लॅनक्वेर यांच्याकडून सोमवारी देण्यात आले.

फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्या दहा दिवसांसाठी ही मर्यादा ठेवण्यात येणार आहे. लहान आकाराच्या कोर्टवर 35 टक्के क्षमतेएवढय़ाच टेनिसप्रेमींना परवानगी देण्यात येणार आहे. 30 मेपासून फ्रेंच ओपन स्पर्धेला सुरुवात होणार असून 9 जूनपासून उपांत्यपूर्व फेरींना सुरुवात होणार आहे. या फेरीपासून स्टेडियममधील प्रेक्षक क्षमता 65 टक्के इतकी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे, असेही क्रीडा मंत्री जीन मायकेल ब्लॅनक्वेर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या