विधानसभा निवडणूकीदरम्यान एक हजार कोटी जप्त, आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी चार राज्यांची निवडणूक संपले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये चार टाप्प्यांसाठी मतदान अजून बाकी आहे. निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणूक दरम्यान एक हजार कोटीहून अधिक रक्कम आणि संपत्ती जप्त केली आहे. विधानसभा निवडणुका दरम्यान आतापर्यंत ही सर्वात मोठे रक्कम आहे. निवडणूक आयोगाने ही दमदार कामगिरी केली आहे.

आतापर्यंत 1 हजार  1 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सर्वाधिक रक्कम तमिळनाडूत जप्त करण्यात आली असून ती 446 कोटी इतकी आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ३00 कोटी तर आसाममध्ये 122 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोटनिवडणुकांदरम्यान 10 कोटी 84 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

निवडणुकीदरम्यान 85 कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. तर 161 कोटी रुपयांची अंमली पदार्थ तर 270 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू म्हणजेच सोने, चांदी जप्त करण्यात आले आहेत. तर 139 कोटी रुपयांचे मोफत वाटण्याचे वस्तू जप्त करण्यात आले आहेत. 2016 विधानसभा निवडणुकांदरम्यान साली 225 कोटी रुपये पकडण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या