
सामना ऑनलाईन । डेहरादून
२१ जून रोजी असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहरादून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्टिट्यूट येथे योग दिवसाच्या निमित्ताने योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होत. या कार्यक्रमात एक महिला अचानक बेशुद्ध होऊन खाली पडल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे.
देहराडूनमध्ये नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या योग दिवसानिमित्त मोठ्या संख्येनं लोकांनी उपस्थिती लावली होती. येथे आयोजित केलेल्या या योग कार्यक्रमात सुधा मिश्रा नावाच्या ७३ वर्षीय वृद्ध महिला योगासन करता करता अचानक खाली पडल्या. तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मृत्यू मागील कारण अजून स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. योग दिवसानिमित्त जमलेल्या लोकांनी या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आहे.
























































