ओएनजीसी प्रकल्पात बिघाड झाल्याने महानगर गॅस पुरवठ्यावर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरणच्या ओएनजीसी गॅस प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्याने महानगर गॅस लिमिटेडच्या गॅस पुरवठा प्रकल्पांना मिळणारा गॅस कमी दाबाने येत असल्याने वडाळा येथील गॅस केंद्रावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील अनेक सीएनजी केंद्रे बंद ठेवण्यात आली असून सीएनजीवर धावणाऱया परिवहन सेवेच्या टॅक्सी, बसेस अशा गाडय़ांवरही प्रभाव जाणवणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने आपल्या घरगुती सीएनजी ग्राहकांवर परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे; परंतु गॅसला पुरेसा प्रेशर नसल्याने शहरातील अनेक सीएनजी गॅस पुरवठा केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळी सीएनजीवरील टॅक्सी, बसेसच्या चलनवलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ओएनजीसीतून गॅस पुरवठा पूर्ववत होताच परिस्थिती सामान्य होईल, असे महानगर गॅस प्रवक्त्या वीरा अस्थना यांनी सांगितले.