साडे आठ लाख रुपये किमतीचा कांदा चोरीला!

437

सध्या सामान्यांच्या डोळ्यात कांद्याने अश्रु आणले आहेत. एकिकडे वाढत्या किमतींमुळे ग्राहकांना जेवणातून कांदा कपात करावी लागत आहे. तर दुसरीकडे कांद्याला सोन्या-चांदीपेक्षा जास्त भाव आला आहे. बिहारमध्ये तब्बल साडे आठ लाख रुपये किमतीचा कांदा चोरीला गेल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारची राजधानी पाटणा येथे सोनारू भागात कांद्याचं गोदाम फोडून चोरट्यांनी साडे आठ लाख रुपये किमतीचा कांदा पळवला आहे. कांद्याच्या 328 गोण्या पळवण्यात आल्या आहेत. चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी गोदामात ठेवलेले पावणे दोन लाख रुपयेही पळवले आहेत. हे गोदाम निर्जन प्रदेशात असल्याने चोरांची चाहूल लागली नाही. मंगळवारी सकाळी गोदाम मालकाला चोरी झाल्याचं लक्षात आलं आणि त्याने पोलिसांना याची माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या