यंदा घरबसल्या होणार महालक्ष्मीचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुलाभाई देसाई रोडवरील महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मंदिरे बंद असल्याने भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. मात्र युटय़ूब लिंकवर तसेच माय चॅनेलवर घरबसल्या भाविकांना दर्शन घेता येईल, असे श्री महालक्ष्मी मंदिर न्यासाच्यावतीने कळविण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिर न्यासच्यावतीने नकरात्रौत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवार, 17 ऑक्टोबरला सकाळी 5.30 वाजता घटस्थापना, सकाळी 6.45 वाजता ध्वजारोहण आणि सकाळी 7 वाजता आरती होईल. 20 ऑक्टोबरला ललीता पंचमी, 24 ऑक्टोबरला दुर्गाष्टमीनिमित्त हवन, पूर्णाहूती, आरती हे कार्यक्रम होतील. नवरात्रौत्सव काळात दररोज सकाळी 7 वाजता आरती, सायंकाळी 6.30 वाजता धूपारती आणि 7.30 वाजता आरती होईल, अशी माहिती मंदिराचे महाव्यवस्थापक श. वि. पाध्ये यांनी दिली आहे.