पेटीएमाठी केवायसी मागत 24 हजार परस्पर खात्यातून लांबवले

448

पेटीएम केवासयी अपडेट करण्यासाठी मोबाईल फोन क्रमाक देत एकाने संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर दिलेल्या नंबरवरून कॉल आल्यावर क्विक सपोर्ट भरण्याची सूचना केली. ते भरल्यानंतर बँक खात्यामधून परस्पर 24 हजार रुपये काढण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रकरणी एका अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजेश विजयकुमार कचरे (रा. अग्रोया नगर,लातूर ) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असून त्यांनी डेबीड कार्ड घेतले आहे. त्यांच्या मोबाईलवर पेटीएम केवायसी अपडेट करण्यासंदर्भातील फोन आला. त्या व्यक्तीने एक मोबाईल नंबर देऊन संपर्क करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर दिलेल्या मोबाईलवरुन त्यांना फोन आला. समोरच्या व्यक्तीने त्यांना केवायसीसाठी टर्म व्हीवर क्वीक सपोर्ट डाऊनलोड करण्यास सांगीतले. त्यामध्ये माहिती भरताना डेबीट कार्ड क्रमांक व सीव्हीव्ही नंबर टाकल्यानंतर मोबाईलची स्क्रिन अचानक बदलत गेली. त्यामुळे त्यांनी मोबाईल बंद करुन पुन्हा सुरु केला. मोबाईल सुरु होताच त्यांना बँक खात्यामधून 24 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ एटीएम कार्ड बंद केले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या