
मोबाईलवरून जेवणाची ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी गुगलवरून स्विगीचा नंबर घेणे जेष्ठ नागरिकाला महागात पडले आहे. सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाच्या बँकिंगचे ऑनलाईन डिटेल्स घेउन 10 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आण्णास्वामी क्रिष्णन (वय 85) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आण्णास्वामी घरी असताना त्यांना स्विगीवरून जेवणाची ऑनलाईन ऑर्डर द्यायची होती. त्यासाठी त्यांनी गुगलवरून स्विगीचा क्रमांक घेऊन फोन केला. त्यावेळी संबंधित सायबर चोरट्याने आण्णास्वामी यांच्या बँकखात्याची गोपनीय माहिती घेऊन ऑनलाईनरित्या 10 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे तपास करीत आहेत.

























































