
मुंबईत सोमवारी पालिका आणि शासकीय लसीकरण पेंद्रांवर फक्त महिलांचे लसीकरण सुरू राहणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे लसीकरण होईल. तर मंगळवारी सकाळच्या पहिल्या सत्रात 9 ते दुपारी 2 या वेळेत शिक्षक तसेच 18 वर्षे व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचे लसीकरण होईल. याच दिवशी दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत दुसरी मात्रा (डोस) देय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही कोविड लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही.
महिला तसेच शिक्षक व विद्यार्थी यांना पहिली किंवा पहिली मात्रा घेऊन विहित कालावधी पूर्ण झाला असेल तर (कोविशिल्ड संदर्भात पहिल्या डोसनंतर 84 दिवस आणि कोव्हॅक्सिन असल्यास पहिल्या डोसनंतर 28 दिवस पूर्ण झाल्यास) दुसरी मात्रादेखील घेता येईल. त्याचप्रमाणे दुसरी मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांना पहिला डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्रदेखील सोबत आणणे आवश्यक असेल. या दोन्ही दिवशी मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका लसीकरण पेंद्रांवर थेट येऊन (वॉक इन) संबंधित घटकातील पात्र नागरिकांना लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाइन पूर्वनोंदणीची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी येताना शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्रदेखील सोबत आणणे आवश्यक आहे.

























































