
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सहकारी पक्ष भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी भाजपला शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या होत्या. त्या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजभर यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली आहे. योगींनी राज्यपाल राम नाईक यांच्याकडे पत्र पाठवून तशी मागणी केली होती.
7 members of Suheldev Bhartiya Samaj Party including OP Rajbhar’s son Arvind Rajbhar also dismissed from their services in committees set up by Uttar Pradesh Government with immediate effect https://t.co/MreX1TZpD9
— ANI UP (@ANINewsUP) May 20, 2019
ओमप्रकाश राजभर हे भारतीय समाज पक्षाचे नेते आहेत. तसेच उत्तर प्रदेशमध्ये मंत्री होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या नेत्यांना जोड्याना हाणा असा सल्ला दिला होता. तसेच भाजपच्या नेत्यांना त्यांनी अर्वाच्य भाषेत शिव्याही घातल्या होत्या. या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल राम नाईक यांच्याकडे ओमप्रकाश राजभर यांना पदमुक्त करा अशी मागणी केली होती. नाईक यांनी ही मागणी मान्य करत राजभर यांना मंत्रिपदावरून काढून टाकले आहे. ओमप्रकाश राजभर यांच्यासह त्यांच्याच पक्षातील सात जणांना विविध समितीवर पदावारील काढून टाकले आहे.
























































