पुणे- पोलिसांच्या दिमतीला आता ‘ओपन जिम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवनाथ शिंदे, पुणे

पुणे शहरातील पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी 15 ठिकाणी ओपन जिम आणि दोन इनडोअर जिमची उभारणी करण्यात आली आहे. या जिमसाठी जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) अर्थसहाय्य केले आहे.

सहा महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीकडे जिमसाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. डीपीसीकडून नाविण्यपूर्ण योजनेखाली प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्यात आली. या ओपन जिम 15 पोलिस ठाण्यांसह पोलीस लाईनमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्तालय , शिवाजीनगर मुख्यालय, चतुःशृंगी पोलीस ठाणे, समर्थ पोलीस ठाणे, भवानी पेठ पोलीस लाईन, खडकी पोलीस ठाणे, खडकी बाजार पोलीस लाईन, सिंहगड पोलीस ठाणे, कोथरूड पोलीस ठाणे, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ओपन जिमची सुरू करण्यात आल्या आहेत. या ओपन जिममध्ये व्यायामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे 10 साहित्ये असून कोरोना कालावधीत रात्रंदिवस रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना या ओमन जिमचा फायदा होत आहे. पोलीस लाईनमध्ये सुरू करण्यात आलेल्या ओपन जिमचा फायदा पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबियांनाही होणार आहे.