
ओपनएआयने त्यांचे सर्वात प्रगत आणि शक्तिशाली एआय मॉडेल ‘चॅट जीपीटी- 5’ लाँच केले. आता ‘जीपीटी- 5’ द्वारे युजर्संनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञांप्रमाणे उत्तरे दिली जातील. जीपीटी-4 नंतर दोन वर्षांनी चॅटजीपीटी 5 ला मल्टिमॉडेल क्षमता आणि मोठ्या कॉन्टॅक्ट्स विंडोसह सादर करण्यात आले आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी स्पष्ट केलंय की, ‘जीपीटी- 5’ हे नवे व्हर्जन अचूकता, वेग, तर्क आणि गणितीय क्षमतांमध्ये प्रगत असेल. लाँचिंग दरम्यान सीईओ सॅम ऑल्टमन यांनी हिंदुस्थानचाही उल्लेख केला. हिंदुस्थान जागतिक स्तरावर एआयची सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकेल, हिंदुस्थानातील लोक आणि व्यवसाय वेगाने एआच तंत्रज्ञान स्वीकारत आहेत. अमेरिकेनंतर हिंदुस्थान ही आमची दुसरी सर्वात मोठी एआय बाजारपेठ असेल, असे त्यांनी यावेळी म्हटले.
चॅट जीपीटी 5 हे लार्ज लँग्वेज मॉडेल चॅटबॉट आणि ऑप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस या दोन्हीमध्ये उपलब्ध असेल. ते तीन वेगवेगळ्या रुपात उपलब्ध असेल. चॅट जीपीटी -5, जीपीटी 5 मिनी आणि जीपीटी 5 नॅनो यांचा समावेश आहे. नवीन मॉडेल 12 पेक्षा जास्त हिंदुस्थानी भाषा समजू शकतो. वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यात चांगले इन्स्टंट सॉफ्टवेअर तयार करण्याची क्षमता आहे.ते अॅप त्वरित तयार करेल.
कसा कराल वापर?
लवकरच जीमेल, गुगल कॅलेंडर आणि गुगल कॉन्टॅक्ट्स थेट चॅटजीपीटीशी जोडता येणार आहेत. एकदा लिंक केल्यावर चॅटजीपीटी या डेटाचा वापर संबंधित उत्तरांसाठी करू शकतो. जीपीटी 5चे असे कोड तयार करेल जे विंडोमध्ये चालवता येतील. प्रत्येक वेळी नव्याने सूचना देण्याची गरज नाही.
लेखनासाठी उपयुक्त
‘जीपीटी- 5’ व्हर्जन लेखनासाठीही चांगला पर्याय ठरू शकते. कामाचे अहवाल, ब्लॉग पोस्ट आणि क्रिएटिव्ह स्टोरीटेलिंगसाठीही खूप उपयुक्त ठरू शकते. एखाद्या युजर्सची वैद्यकीय माहिती चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकते. योग्य प्रश्न विचारणे आणि निर्णय घेण्यात मदत करू शकते.
कोडिंग आणि व्यावसायिक कामांसाठी अधिक सक्षम
चॅटजीपीटीचे नवे ‘जीपीटी- 5’ व्हर्जन आता मोठे प्रोजेक्ट्स हाताळू शकते. अधिक संदर्भ लक्षात ठेवते आणि कामाच्या विविध टप्प्यात मदत करते. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट कोडिंग क्षमता आहे. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी ते सर्वात पॉवरफुल मॉडेल असल्याचा दावा करण्यात येतोय. इनपुट कमी असतानाही मदत करू शकते.