तर याचाही हिशेब नंतरच्या काळात होईल; आज सुपात आहात, कधी जात्यात जाल कळणार नाही – अजित पवारांनी दिला सज्जड दम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्ता येत असते, जात असते, सत्ताधारी बदलत असतात. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला येत नाही. आज तुम्ही सुपात आहात पण जात्यात कधी जातील सांगता येत नाही. तुम्ही जर दबावातून अशा प्रकारे पक्षपाती कारवाया करीत राहिलात तर त्याचाही हिशेब नंतरच्या काळात होऊ शकतो, असा सज्जड दम विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत सत्ताधारी पक्षाला दिला.

अजित पवार यांनी विरोधी पक्षांतर्फे अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेली अवमानकारक वक्तव्ये, मंत्र्यांचा भ्रष्टाचार, राज्याबाहेर चाललेले उद्योग, वाढती बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार, विरोधकांवरील कारवाई या मुद्दय़ांवरून त्यांनी सरकारवर घणाघात केला.

विरोधकांना जेलमध्ये टाकणार का?

विरोधकांवर होणाऱया कारवायांचा उल्लेख करताना अजित पवार म्हणाले की, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणात ईडीने अटक करून 100 दिवस जेलमध्ये ठेवले. पण या प्रकरणात ईडी तोंडावर आपटली. ईडीने आपल्या अधिकारांचा वापर करीत संजय राऊत व प्रवीण राऊत या दोघांनाच अटक करून असमानतेची वागणूक दिली असे न्यायालयाने सुनावले. पुढे त्यांना जामीन मिळाला. विरोधी पक्षाचे खासदार आहेत म्हणून पेंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून त्यांना थेट तुरुंगात टाकणार का, असा सणसणीत सवाल अजित पवार यांनी केला.

महाराष्ट्राबाबतही तुम्ही कराल

 भाजपने केलेल्या गद्दारीचा धागा पकडून ते म्हणाले की, अहो, मोठय़ा भावाचा म्हणजे शिवसेनेचा हात धरून लहान भाऊ म्हणजे भाजप कधी मोठा झाला, मोठय़ा भावाचे घर कसे मोडले, हे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. बहुदा तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्ही करणार नाही ना अशा शब्दात भाजपचे वाभाडे काढले.

भाजपचे तीन जावई

भाजपचे तीन जावई आहेत. एक सीबीआय, दुसरा इन्कम टॅक्स आणि तिसरा ईडी. या तीन जावयांपैकी एक असलेल्या सीबीआयच्या गैरवापराबाबतचा हा अहवाल आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री बोलतात तेव्हा भाजपवाले बाके वाजवत नाहीत!

भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणाऱया वागणुकीवर अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीस बोलतात तेव्हा सर्व भाजपवाले बाके वाजवतात मुख्यमंत्री बोलतात तेव्हा मात्र एकही भाजपवाला बाके वाजवत नाही. मुख्यमंत्री करोडो रुपयांच्या योजना सभागृहात मांडत होते तेव्हा एकाही भाजपवाल्याने प्रतिसाद दिला नाही. त्यात देवेंद्र फडणवीस तर इतके अस्वस्थ दिसत होते की सांगता सोय नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला. तुम्ही मुख्यमंत्री आहात, मान्यता घेतो आणि प्रस्ताव पाठवतो असं म्हणता. हे मी करणार, असं सांगा ना. क@बिनेटमध्ये पाठवतो का सांगता, मी क@बिनेटमध्ये करून घेणार सांगा. लोकांमध्ये संदेश गेला पाहिजे. हे महाराज उपमुख्यमंत्री असताना रेटून बोलत आहेत. तुम्ही मात्र मागे मागेच येत आहात, असा निशाणाही अजित पवार यांनी साधला