
कालनिर्णयतर्फे वाचकांसाठी पाकनिर्णय 2022 या पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाताचे प्रकार, पालेभाज्यांतून बनवलेले पदार्थ, गोड बेक्ड पदार्थ आणि चटपटीत चटण्या या चार भागांमध्ये ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. तर स्पर्धक दोन विभागांसाठी पाककृती पाठवू शकतात. तरी स्पर्धकांनी आपल्या पाककृती [email protected] या ईमेलवर किंवा कुरियर करण्याचे आवाहन कालनिर्णयतर्फे करण्यात आले आहे. 31 मेपर्यंत या स्पर्धेसाठी पाककृती पाठवू शकणार आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी http://www.kalnirnay.com/paknirnay या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पाककृती पाठविण्याचा पत्ता – सुमंगल प्रेस प्रा. लि., 172, एम.एम.जी.एस. मार्ग, दादर (पूर्व) मुंबई – 400014.


























































