
अमेरीकेतील लॉस एंजलिस येथे नुकताच 96वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 2024 डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यावेळी ‘ओपनहायमर’ या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला 13 नामांकने मिळाली होती त्यापैकी 7 पुरस्कार त्यांनी आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे यंदा ‘ओपनहायमर’ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘ओपनहायमर’ सिनेमा ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या विभागात ‘ओपनहायमर’ ने ‘अमेरिकन फिक्शन’, ‘एनॉटनी ऑफ अ ऑल बॉर्बी’, ‘द होल्डोवर्स’, ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’, ‘मॅस्ट्रो’, ‘पास्ट लाइव्स’, ‘पुअर थिंग्स’ आणि ‘द जोन ऑफ इंट्रेस्ट’ या सिनेमांना पिछा़डीवर टाकले आहे. ‘ओपनहायमर’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या विभागात ख्रिस्तोफर नोलन हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत. क्रिस्टोफर यांना पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी या स्पर्धेत ‘एनॉटमी ऑफ ए फॉल’चे दिग्दर्शक जस्टीन ट्रीट, ‘किलर्स ऑफ प्लॉवर मून’चे दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी, ‘पुअर थिंग्स’चे दिग्दर्शक यॉर्गोस लेंथीमॉस आणि ‘द डोन ऑफ इंटरेस्ट’चे दिग्दर्शक जोनाथन ग्लॅजरवर यांना मात दिली आहे.
‘ओपनहायमर’ ने सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारही आपल्या नावावर कोरला आहे. या सिनेमाचा अभिनेता सिलीयन मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर याच सिनेमातील रॉबर्ट डाऊनी जूनिअर याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला आहे. याचबरोबर यासह सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअरसह सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण हे पुरस्कारावरही आपली छाप सोडली आहे. एवढेच नाही तर याआधीही या सिनेमाने बाफ्टा पुरस्कार, गोल्डन ग्लोब्स आणि क्रिटिक्स चॉईस अॅवॉर्डवर आपले नाव कोरले आहे.
‘या’ पुरस्कारांवर ओपनहायमरची बाजी
– सर्वोत्कृष्ट सिनेमा – ओपनहायमर (Oppenheimer)
– फिल्म एडिटिंग – ओपनहायमर (Oppenheimer)
– सर्वोत्कृष्ट सिनेमॅट्रोग्राफी – ओपनहायमर (Oppneheimer)
– सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर – ओपनहायमर (Oppenheimer)
– सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिलियन मर्फी (Cillian Murphy – Oppenheimer)
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan – Oppenheimer)
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रॉबर्ट डाउनी जूनिअर (Robert Downey JR- Oppenheimer)
पुरस्कारांची यादी
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – एमा स्टोन (Emma Stone – Poor Things)
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – दा’वाइन जॉय रँडॉल्फ (DA’Vine Joy Randolph)
– सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म – वॉर इज ओव्हर (War is Over)
– सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचरचा पुरस्कार – द बॉय अँड द हेरॉन (The boy and the Heron)
– सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले – ॲनाटॉमी ऑफ अ फॉल (Anatomy of a Fall)
– सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले – अमेरिकन फिक्शन (American Fiction)
– सर्वोत्कृष्ट केशभुषा आणि मेकअप – ‘पुअर थिंग्स’ (Poor Things)
– सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन – पुअर थिंग्स (Poor Things)
– सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन – होली वॉडिंग्टन (पुअर थिंग्स) (Holly Waddington – Poor Things)
– सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट – द झोन ऑफ इंटरेस्ट (The Zone of Interest)
– सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – गॉडझिला मायनस वन (Godzilla Minus One)
– सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्टफिल्म – द लास्ट रिपेअर शॉप (The Last Repair Shop)
– सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – 20 डेज इन मारियुपोल (20 Days in Mariupol)
– लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म – द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर (The Wonderful Story of Henry Sugar)
– सर्वोत्कृष्ट साऊंड – द झोन ऑफ इंटरेस्ट (The Zone of Interest)
– सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं – ‘बार्बी’ या चित्रपटातील ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर?’ गाणं (Billie Eilish What Was I Made For)




























































