धाराशिव – कोरोनाचे 12 पॉझिटीव्ह आढळले, रुग्ण संख्या 116 वर

523

धाराशिव जिल्ह्यात आज 12 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले असून जिह्यातील रुग्णांची संख्या 116 झाली आहे. यातील 58 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून उर्वरित 55 जणांवर उपचार सुरु करण्यात आहेत. 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

आज सापडलेल्या रुग्णांमध्ये कळंब तालुक्यातील आठ रुग्ण असून ते पुर्वीच्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आहेत. हासेगाव येथील दोन असून ते अंदोरा येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील आहेत. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे दोन रुग्ण सापडले असून ते  पुणे येथून आलेले आहेत.

राज्यात 42 हजार 215 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त, वाचा आजची आकडेवारी

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 116 झाली यातील 58 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित 55 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या