तीन संशयितांचा अहवाल पॉझिटीव्ह, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 38 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिल्ह्यातील आणखी तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. यामध्ये धाराशिव शहरातील पापनाश नगर मधील एक, कळंब तालुक्यातील शिराढोण येथील एक आणि धाराशिव तालुक्यातील तेर मधील एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 38 वर गेली आहे. यातील 8 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर 30 रुग्णांवर विविध शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने 25 मे 2020 रोजी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या अहवाला मधील प्रलंबित असलेल्या पाच अहवालांमधून तीन व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोन व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या तीन व्यक्ती पैकी एक धाराशिव शहरातील पापनाश नगरचा रुग्ण असून तो मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. दुसरा तेर येथील रुग्ण असून तो पुणे येथून प्रवास करून आलेला आहे. तर तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा कळंब  तालुक्यातील शिराढोण येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे.

‘कोरोना फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है’, वुहान लॅबमधील ‘बॅट वूमन’ शी झेंगलींचे खळबळजनक विधान

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 38 वर गेली असून यातील 8 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सर्वाधिक रुग्ण उमरगा तर सर्वात कमी रुग्ण तुळजापूर तालुक्यात आहेत.  उमरगा – 8, कळंब -8, परंडा -6, लोहारा- 5, धाराशिव – 5, वाशी -3, भूम – 2, तुळजापूर – 1  अशी तालुकानिहाय संख्या आहे. जिल्ह्यात सध्या 30 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.