
धाराशिव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळविली आहे. या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व म्हणजे 15 पैकी 15 उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपाला ’पळता भुई थोडी’ झाली असून भाजपाच्या पॅनलचा एकही उमेदवा विजयी झाला नाही.
धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. भाजपाने या निवडणुकीसाठी मोठी ताकद लावली होती. परंतु महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी एकजीवाने ही निवडणूक लढविली होती. त्यामुळे मतदारांनी महाविकास भरभरुन मतदान केले होते.
आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवानात मतमोजणी करण्यात आली. जिल्हा बँकेच्या संचालकाच्या 15 जागांसाठी निवडणूक होत होती. यामध्ये महाविकास आघाडीचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. 10 जागेसाठी झालेल्या मतदानामध्ये महाविकास आघाडीचे दहाही उमेदवार विजयी झाले आहेत. विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांचा वतीने जल्लोष करण्यात आला.
































































