घरपोच गॅस सिलिंडरसाठी ओटीपी आवश्यक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

घरपोच गॅस सिलिंडरसाठी पुढील महिन्यापासून ग्राहकांना ओटीपी क्रमांक द्यावा लागणार आहे. एलपीजी गॅस सिलिंडरची बुकिंग करणाऱ्या ग्राहकालाच सिलिंडरची डिलिव्हरी झाली आहे का हे पडताळण्यासाठी तेल कंपन्यांनी सिलिंडरच्या डिलिव्हरीवेळी ओटीपी क्रमांक देण्याची योजना आणली आहे. गेल्या काही दिवसांपासून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच सिलिंडरची डिलीव्हरी योग्य ग्राहकालाच झाली का हे जाणून घेण्यासाठी तेल कंपन्यांनी डिलीव्हरी ऑथिंटिकेशन कोड (डीएसी) या प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर सर्वप्रथम 100 शहरांत ही प्रणाली लागू करण्यात येणार असून ओटीपी क्रमांक देणे ग्राहकांसाठी सुलभ असल्यास ही प्रणाली सर्वत्र लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीची अंमलबजावणी जयपूरमध्ये सुरू झाली आहे.