अभिषेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचे अनेक अभिनेते ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहे. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या पाठोपाठ आता अभिषेक बच्चन देखील वेब सीरिजमध्ये झळकणार असून तो अमेझॉन प्राईमच्या ‘ब्रीदः इन टू द शैडोज’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, सायको लॉजिकल क्राइम थ्रिलरचा फर्स्ट लुक नुकताच लाँच झाला आहे. यात अभिषेक बच्चन एका हरकलेल्या मुलाच्या पोस्टरकडे एक गहन दृष्टीक्षेप टाकताना दिसतो आहे. याबाबत अभिषेक म्हणाला,  ‘मी माझ्या पहिल्या डिजिटल सिरीजच्या प्रदर्शनासाठी आनंदित आहे. येत्या दिकसांमध्ये आम्ही जगासमोर हळू हळू ‘ब्रीद’चे रहस्य उलगडणार आहोत.’  ‘ब्रीद’ चा नवीन सीजन 10 जुलैला प्रदर्शित होणार आहे.