
सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मार्गदर्शकतत्त्वांवर केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, ‘आम्ही सर्व स्टेकहोल्डरना समान अधिकार देऊ इच्छित आहोत’. इंडिया टुडे ग्रुपच्यासोबत झालेल्या मुलाखतीवेळी प्रकाश जावडेकर यांनी विचारले की, फिल्म आणि टीव्हीसाठी रेग्युलेशन बॉडी आहे तर मग ओटीटी साठी तशी बॉडी का नसावी?
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘आम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेंसॉर सर्टिफिकेट आवश्यक केलेले नाही, आम्ही तर सेल्फ रेग्युलेशनवर बोलत आहोत, ओटीटी प्लॅटफॉर्मला स्वत: सांगावे लागेल की, फिल्म कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडते, तसेच त्यांना सांगावे लागेल की ए कॅटेगरीच्या कंटेंटसाठी काही पॅरेंटल कंट्रोल आहे आणि कोणत्याही गोष्टीचा चुकीचा वापर होऊ नये.’
जावडेकरांनी सांगितले की, ‘ओटीटी प्लॅटफॉर्मला आपला कंटेंट स्वत: कोणत्या कॅटेगरीत बसतो ते स्पष्ट करावे लागेल. त्यांना आधीच घोषित करावे लागेल की, कंटेंट U (यूनिव्हर्सल), U/A 7+ (वर्ष), U/A 13+, U/A 16+ आहे आणि कोणता कंटेंट A (18+) आहे.’
‘थिएटर मध्ये तुम्ही मुलांना एडल्ट चित्रपट दाखवण्यापासून रोखू शकतात. त्यासारखीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्यवस्था करावी लागेल. प्रकाश जावडेकर म्हणाले की, काल आम्ही मार्गदर्शकतत्त्वे जाहीर केले आणि देशातूनच नाही तर जगभरातून अभिनंदनाचा संदेश येऊ लागलेत, लोक त्याचं कौतुक करत आहेत.
आम्ही सेंसॉर बद्दल काही बोललेलोच नाही, ओटीटी सेल्फ रेग्युलेशन बॉडी, जसे टीव्ही चॅनेलसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखी खाली सहा सदस्यांची एक समिती असते तशी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.





























































