
300 गुणांपैकी एका विद्यार्थ्याला 310 गुण आणि दुसऱया विद्यार्थ्याला 315 गुण मिळाले आहेत. हे कसे झाले? याविषयी अनेकांना आश्चर्य वाटेल, परंतु हे खरे आहे. बंगळुरूमधील राजीव गांधी विद्यापीठ ऑफ हेल्थ सायन्स बंगळुरू विभागाने हे करून दाखवले आहे. हा निकाल पाहून विद्यार्थ्यांनाही धक्का बसला. बीएस्सी नार्ंसगच्या दुसऱया सेमिस्टरचा निकाल जाहीर करण्यात आला. यात हा प्रकार उघडकीस आला. याच्या परीक्षा 1 जानेवारी 2024 ला घेण्यात आल्या होत्या. हा धक्कादायक प्रकार समजताच निकाल तत्काळ रोखण्यात आला. एका रात्रीत निकाल बदलून तो वेबसाइटवर अपलोड करण्यात आला.
























































