
तामिळनाडूतील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने 108 जागा जिंकल्या आहेत. मात्र सत्तास्थापनेसाठी गरजेचे असलेले 118 चे संख्याबळ त्यांच्याकडे नसल्याने त्यांचा सत्तास्थापनेचा दावा राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांकडून फेटाळण्यात आला.
या सगळ्यादरम्यान अण्णा द्रमुक व द्रमुक मध्ये देखील चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र इंडिया टुडेने त्यांच्या सुत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.
या सगळ्यात अण्णा द्रमुकने त्यांचे 15 आमदारांना पुदुच्चेरी येथील एका रिसॉर्टवर हलवले आहे. अण्णा द्रमुक पक्षाचे प्रमुख के पलानीस्वामी यांनी पुदुच्चेरी येथील द शोर त्रिश्वम या रिसॉर्टमध्ये 20 रुम बुक केल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.




























































