
भाजप दरवेळी मोदींच्या नावावर नाही जिंकू शकत अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी केली आहे. तसेच काँग्रेसने स्थानिक नेतृत्वाच्या जोरावरच थोडेफार यश मिळवले आहे असेही ओवैसी म्हणाले.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ओवैसी म्हणाले की “महाराष्ट्र हरयाणात मोदी शहांनी 12-15 सभा घेतल्या. तरी भाजपला अपेक्षित असा निकाल लागला नाही. भाजप दरवेळी मोदींच्या लोकप्रियतेवर विजय नाही मिळवू शकत. भाजपसाठी ही धोक्याची घंटी आहे.” हरयाणामध्ये भाजपचा पराभव झाला आहे असे मत ओवैसींनी व्यक्त केले. तसेच भाजपने आता अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असेही ओवैसी म्हणाले.
काँग्रेसच्या नेतृत्वाने या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाही असा घाणाघातही त्यांनी यावेळी केला. दोन्ही राज्यात जेवढे यश मिळाले त्याचे श्रेय स्थानिक नेत्यांचे आहे असेही ओवैसी यांनी नमूद केले.


























































