नगरमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम अंतिम टप्प्यात, एक टनहून अधिक ऑक्सिजनची निर्मिती होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरमध्ये थोरात सहकारी कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या तीन ते च्चार दिवसांत या प्लांटमधून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात या प्लांटच्या निर्मितीचे काम सुरू आहे.

या ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीच्याअ कामाची पाहणी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता भासू लागली यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने नवा ऑक्सिजन प्लांट निर्मितीचा निर्णय घेतला. तैवान येथून ही अद्ययावत मशिनरी मागवली असून यामधून दररोज अकराशे किलो ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या प्लांट च्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या तीन-चार दिवसांमध्ये शासकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर या प्लांट मधून ऑक्सिजनचे नियमित उत्पादन सुरू होणार आहे. यामुळे संगमनेर शहर व परिसरातील रुग्णालय आणि कोरोना रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.