पी. चिदंबरम यांची दिवाळीही तिहार तुरुंगात?

586

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या सुटकेचे सध्या कोणतेही चिन्ह दिसत नाही. गुरुवारी न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीच 24 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

चिंदबरम यांना 21 ऑगस्टला सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटक केली होती. तेव्हापासून आतापर्यंत एकदाही त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केलेला नाही. त्यामुळे सतत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली जात आहे. 25 ऑक्टोबरपासून यंदा दिवाळीला सुरुवात होत आहे. जर 24 ऑक्टोबरला चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ झाली तर त्यांची यंदाची दिवाळीही तिहार तुरुंगात जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या