चिदंबरम यांना न्यायालयाचा झटका, न्यायालयीन कोठडीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीतील रोझ अव्हेन्यू न्यायालयाने 14 दिवसांची वाढ केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने चिदंबरम यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पी. चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे.  तेव्हापासून ते सीबीआयच्या कोठडीत आहेत. 5 सप्टेंबर रोजी त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना रोझ अव्हेन्यू न्यायालया हजर करण्यात आले होते. त्यावेळी चिदंबरम यांचे वकिल कपिल सिब्बल यांनी त्यांच्या कोठडीत वाढ न करण्याची मागणी केली होती. तर सीबीआयने चिदंबरम यांची कोठडी वाढवण्याची मागणी केलेली. न्यायालयाने सीबीआयच्या मागणीनुसार चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.