नवरात्रीत 1993सारखे बॉम्बस्फोट घडवायचे होते! आयएसआय, अंडरवर्ल्डने मिळून रचले कट-कारस्थान

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या कट-कारस्थानाबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दहशतवाद्यांचा अनेक राज्यांत बॉम्बस्पह्ट घडवण्याचा कट होता. यासाठी आयएसआय व अंडरवर्ल्डने मिळून मोठी तयारी केली होती. नवरात्रीत मुंबईवरील 1993च्या साखळी बॉम्बस्पह्टांसारखे स्पह्ट घडवायचे होते. आयएसआयने फर्मान काढताच हे बॉम्बस्पह्ट करणार होतो, अशी खळबळजनक कबुली दहशतवाद्यांनी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकापुढे दिली आहे.

ओसामा आणि झिशान कामर या दोघांच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील सूत्रधारांनी अटकेत असलेल्या दहशतवाद्यांना रेकी तसेच स्फोटके व अत्याधुनिक शस्त्रांची व्यवस्था करण्यास सांगितले होते. यातील दोघे पाकिस्तानला गेले होते.

गर्दीच्या ठिकाणी तेल टँकरचा स्फोट

अटकेत असलेले दोन दहशतवादी पोपटासारखे बोलू लागले असून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. ‘पाकिस्तानी मॉडय़ूल’चा भाग बनलेल्या दहशतवाद्यांना रेल्वे रुळ व पूल उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मोठय़ा सभाही निशाण्यावर होत्या. गर्दीच्या ठिकाणी तेलाच्या टँकरने स्फोट घडवला जाणार होता. दहशतवादी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केल्यानंतर अनेक लोकांना भेटणार होते. दाऊदचा भाऊ अनिस दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. तो 26/11च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत होता, असे तपास अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

  • 26/11च्या हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला कराचीजवळ ज्या फार्महाऊसवर प्रशिक्षण दिले होते, तेथेच ओसामा व झिशान या दोघांना नेण्यात आले होते. कसाबप्रमाणेच अंदाधुंद गोळीबार करून राजकीय नेते व धर्मगुरूंना संपवण्याच्या सूचना दहशतवाद्यांना देण्यात आल्या होत्या.
आपली प्रतिक्रिया द्या