पाकड्यांकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

299

पाकिस्तानने पुन्हा जम्मू कश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. या गोळीबारात हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला असून इतर चारजण जखमी झाले आहेत.

सीमेजवळ कृष्णा खोर्‍यात सकाळी 11 वाजता पाकिस्तानने गोळीबार केला. या गोळीबाराचे हिंदुस्थानने चांगले प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात एक जवान शहीद झाला. गेल्या आठवड्यातही पाकिस्तानने राजौरी जिल्ह्याजवळ नौशेरा भागात गोळेबार केला होता. त्यातही हिंदुस्थानी जवान शहीद झाला होता. हिंदुस्थानने केलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या