पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, हिंदुस्थानच्या प्रतिहल्ल्यात 3 सैनिक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव हिंदुस्थानी जवानांनी हाणून पाडला आहे. हिंदुस्थानने दिलेल्या प्रत्युत्तरात चार पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत तसेच पाकिस्तानच्या चार चौक्याही उद्ध्वस्त केल्या आहेत.

नौशेरा सेक्टरच्या कलसिया परिसरात सीमेपलीकडून दहशतवाद्यांची एक टोळी घुसखोरीचा प्रयत्न करत होती. त्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानी लष्कराने राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पहाटे अंदाधुंद गोळीबार सुरु केला. दहशतवाद्यांना बचावण्यासाठी ही कव्हर फायरिंग होती.