
सामना प्रतिनिधी । अबुधाबी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या येथे सुरू असलेल्या कसोटीत पाकिस्तानी फलंदाजाचा बिनडोकपणा जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींनी पाहिला. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात हास्यास्पद रनआऊट यावेळी म्हटले गेले. एखादा फलंदाज अशा पद्धतीने धावचीत होईल याचा कोणाला विश्वासही बसणार नाही.
Unbelievable.
Azhar Ali run out whilst chatting with Shafiq in the middle, thinking he’s hit a four. Except he didn’t. Dumb and dumber.
Easily the stupidest piece of cricket I’ve ever seen in 35 years of watching and playing cricket.
Pakistan bloody Zindabad.#PAKvsAUS pic.twitter.com/nhFgRoq2aw
— Abu Eesa Niamatullah (@Niamatullah) October 18, 2018
पाकिस्तानच्या दुसर्या डावातील 53व्या षटकात पीटर सीडलच्या गोलंदाजीवर अझर अलीने फटका मारला. त्यानंतर त्याने बॅटने मारलेल्या चेंडूने सीमारेषा ओलांडली अशा आविर्भावात अझर अली व असाद शफीक खेळपट्टीच्या मधोमध गप्पा मारत उभे राहिले. मात्र चेंडूने सीमारेषा ओलांडली नव्हती. यावेळी मिचेल स्टार्कने यष्टीरक्षक टीम पेनकडे चेंडू थ्रो केला अन् अझर अली 64 धावांवर धावचीत झाला.
दरम्यान, पाकिस्तानच्या 538 धावांचा पाठलाग करणार्या ऑस्ट्रेलियाने 1 बाद 47 धावा केल्या असून आता त्यांना अद्याप 491 धावांची गरज आहे.




























































