पाकड्यांकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी भागात गोळीबार सुरू केला. हिंदुस्थानी सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात लक्ष्मण गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मण मूळचे राजस्थानचे रहिवासी होती.  2021 मध्ये जानेवारी महिन्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने गोळीबार केला होता. त्यात तीन जवान शहीद झाले होते.