सीमेवर धुमश्चक्री; पाकड्यांचा गोळीबार, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकडय़ांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच ठेवले असून जम्मू-कश्मीरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या गोळीबारात हिंदुस्थानी लष्कराचा एक जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत. पाकडय़ांच्या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. रात्री उशिरापर्यंत सीमेवर धुमश्चक्री सुरू होती.

दुपारी 3.45च्या सुमारास पूंछ जिह्यात देगवार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू केला. सीमेलगतच्या गावांना टार्गेट करण्यात आले. पाकडय़ांच्या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या धुमश्चक्रीत एक जवान शहीद झाला असून तीन जण जखमी आहेत. या गोळीबारामुळे सीमेलगतच्या गावांमध्ये घबराट पसरली. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत गोळीबार सुरू होता.