पीओकेत पाकिस्तानची नव्हे, दहशतवाद्यांची सत्ता

518

पीओकेत पाकिस्तानची नव्हे, दहशतवाद्यांचीच सत्ता आहे. त्यांनीच या भागाचा ताबा घेतलाय असे सांगत सतत धार्मिक जिहादचा खेळ करीत दहशतवादाच्या मदतीने कश्मीर खोरे अशांत ठेवण्याचे तुमचे राक्षसी इरादे आम्ही हाणून पाडू. दहशतवादी आणि त्यांचे म्होरके आता कितीही हातपाय मारू देत, जम्मू-कश्मीरात संपूर्ण शांतता आणि सुरक्षेचे राज्य आम्ही आणणारच असा संतप्त इशारा हिंदुस्थानी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी श्रीनगरमध्ये बोलताना पाकिस्तान आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना दिला.

पाकव्याप्त कश्मीरचा ताबा मिळवणारे दहशतवादी हिंदुस्थानी सरकारने कश्मीरातील 370 कलम हटवल्यामुळे चवताळले आहेत. कारण त्यांना कश्मीरचा विकास झालेला आणि राज्यात शांतता प्रस्थापित व्हायला नको. आता लष्कराच्या कडेकोट बंदोबस्तामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांना कश्मीर खोऱयात ‘जिहादी’ नंगानाच करता येत नाहीय हेच त्यांचे आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांना खुपतेय असे सांगून जनरल रावत म्हणाले, पीओकेसह गिलगिट आणि बाल्टिस्तान हाही आम्ही जम्मू-कश्मीरचाच भाग मानतो. त्यामुळे पीओकेत राहून कश्मीरात हिंसाचार घडवण्याचे सैतानी इरादे आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही असा सणसणीत दमही रावत यांनी पाकिस्तानला भरला.

आपली प्रतिक्रिया द्या