कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तान राष्ट्रीय विमान कंपनी PIA विकणार; बिडर्समध्ये मुनीर यांच्या फौजी कंपनीचा समावेश

Pakistan Privatization, PIA Sale, IMF Loan, Fauji Foundation, Asim Munir, National Carrier Bidding

कर्जबाजारी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) $७ अब्ज चे पॅकेज मिळवण्यासाठी आपली राष्ट्रीय विमान कंपनी, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA), विकण्यास निघाला आहे. पीआयएमधील ५१-१००% हिस्सा विकणे ही आयएमएफने घातलेली मुख्य अट आहे.

पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी जाहीर केले की, पीआयएसाठीची बोली २३ डिसेंबर २०२५ रोजी थेट प्रसारित केली जाईल.

पात्र ठरलेले बिडर्स:

बोलीसाठी पुढील चार कंपन्या पात्र ठरल्या आहेत

१. लकी सिमेंट कन्सोर्टियम

२. आरिफ हबीब कॉर्पोरेशन कन्सोर्टियम

३. फौजी फर्टिलायझर कंपनी लिमिटेड

४. एअर ब्लू लिमिटेड

फौजी फर्टिलायझर ही लष्कराच्या नियंत्रणाखालील फौजी फाऊंडेशन चा भाग आहे. लष्करप्रमुख आणि पाकिस्तानातील शक्तिशाली व्यक्ती असलेले असीम मुनीर हे क्वार्टरमास्टर जनरलची (QMG) नियुक्ती करतात, जे फौजी फाऊंडेशनच्या बोर्डावर आहेत, ज्यामुळे त्यांचा या कंपनीवर अप्रत्यक्ष प्रभाव आहे.

पीआयएच्या घसरणीची कारणे:

पीआयएची आर्थिक स्थिती अनेक वर्षांपासून बिकट आहे. २०२० मध्ये ३०% पेक्षा जास्त वैमानिकांकडे बनावट परवाने असल्याचे उघड झाले. या पायलट घोटाळ्यामुळे युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) सह यूके आणि अमेरिकेने पीआयएच्या विमानांवर बंदी घातली. यामुळे एअरलाइनला अब्जावधींचे नुकसान झाले.

याशिवाय, २०२० चा फ्लाईट ८३०३ अपघात, अति-कर्मचारी भरती, राजकीय नियुक्त्या, आणि पीकेआर २०० अब्ज पेक्षा जास्त आर्थिक नुकसान यामुळे पीआयए पूर्णपणे संकटात सापडली. गेल्या दोन दशकांतील हा पाकिस्तानचा पहिला मोठा खासगीकरणाचा प्रयत्न आहे.