मोदींची वेळ संपत आलीय, शाहिद आफ्रिदी बरळला; नेटकऱ्यांनी तुडवला

3409

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल केल्यानंतर हिंदुस्थानविरोधात गरळ ओकणारा पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले. यानंतर देशातील अनेक भागांमध्ये आगडोंब उसळला. पाकिस्तानच्या नेत्यांनीही यावर आदळआपट केली होती. आता शाहिद आफ्रिदी यानेही या मुद्द्यावर ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोदींवर निशाणा साधताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, मोदी यांची वेळ संपत आली आहे. त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसणीला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. फक्त कश्मीरमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात मोदींच्या विरोधात आंदोलन सुरू असून नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्यांकाविरोधात आहे. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने हा कायदा तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा याचे फल त्यांना लवकरच मिळेल. असे ट्वीट आफ्रिदीने केले.

शाहिद आफ्रिदीच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच धुलाई केली आहे. अनेकांनी तुझी फलंदाजी चांगली होती मात्र राजकारणात घुसू नको आणि आधी तुझ्या स्वत:च्या देशात सुरू असलेल्या दहशतवादावर तोंड उघड असा सल्ला दिला आहे. तर काहींनी त्याची औकातही काढायला मागेपुढे पाहिले नाही.

दरम्यान, हिंदुस्थानविरोधात गरळ ओकण्याची आफ्रिदीची ही पहिलीच वेळ नाही. पुलवामा हल्ला आणि कमल 370 रद्द केल्यानंतरही त्याने ट्वीट करून आपला नापाक चेहरा दाखवला होता. यानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू खासदार गौतम गंभीर याने त्याला सडेसोड प्रत्युत्तर दिले होते.

‘कलम 370’वर बरळणाऱ्या आफ्रिदीची गंभीरने बोलती बंद केली

आपली प्रतिक्रिया द्या