जम्मू कश्मीरमधील कारवाईमुळे भेदरला पाकिस्तान, शेअर बाजार कोसळून कोट्यवधींचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमध्ये सैन्याने केलेल्या कारवाईचे पडसाद पाकिस्तान शेअर बाजावर उमटले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तान शेअर बाजारात सातत्याने कोसळत आहे. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे आतापर्यंत 21 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे दलालांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणे निधीने जरी सहाशे कोटींचे कर्ज मंजूर केले असले तरी पाकिस्तानची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी वेळ लागेल असे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच अर्थव्यवस्था सांभाळण्यात इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया ट्विटर युजर्सनी व्यक्त केली आहे. तसेच यामुळे पाकिस्तान अजून दरीद्री होणार आहे.

ब्लूममर्गच्या वृत्तानुसार गेल्या दोन वर्षात पाकिस्तानच्या शेअर बाजाराने सर्वात वाईट कामगिरी केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 6 लाख 88 हजार कोटी रुपये बुडाले आहेत. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 30 टक्क्यांनी कोसळला आहे. तर महागाई दर 10 टक्क्यांवर पोहोचला असून तो वाढण्याची शक्यता आहे.