पाकिस्तानच्या शेअर बाजार गडगडला, कोट्यवधींचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर अनेक गुंतवणूकदारांनी आपले पैसे परत घेण्यास सुरूवात केली आहे. यामुळे बुधवारी पाकिस्तानचा शेअर बाजार गडगडला असून कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये काही मिनिटात एक हजार अंकानी कोसळला. बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशावेळी हिंदुस्थानशी तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये भितीचे वातावरण अहे. त्यामुळे पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

कराची शेअर बाजार गेल्या दोन दिवसांत 2 हजार अंकांनी कोसळला आहे. तसेच गेल्या 13 दिवसांत पाकिस्तानचे सहा टक्के नुकसान झाले आहे.