
ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी पाकिस्तानी वंशाच्या शबाना मेहमूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कीर स्टार्मर यांनी केलेल्या मंत्रिमंडळ बदलात शबाना यांना स्थान मिळाले आहे. त्या अँजेला रेनर यांची जागा घेणार आहेत. ब्रिटनच्या गृहखात्याची धुरा हाती आलेल्या शबाना मेहमूद या पहिल्या मुस्लिम महिला आहेत. शबाना यांचा जन्म 1980 साली इंग्लंडच्या बर्मिगहॅम येथे एका पाकिस्तानी कुटुंबात झाला आहे. गृहमंत्रीपदाची जबाबदारी हा सन्मान असल्याचे त्या म्हणाल्या. देशाच्या नागरिकांची सुरक्षितता हे माझे पहिले प्राधान्य राहील, असे त्यांनी सांगितले.