चमचमीत पालक पनीर रोल

3459

pratik-poyrekar-chef पालकची भाजी केली तर मुलं लगेच नाकं मुरडतील पण तोच पालक जर रोल करून त्यात पनीर घालून दिलात तर आनंदाने मुलं खातील. त्यामुळे शेफ प्रतीक पोयरेकर यांनी आज बच्चे कंपनीसाठी खास पालक पनीरच्या चमचमीत रोल्सची रेसिपी दिली आहे. 

 

साहित्य – 

पोळी –  गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, गरजेपुरते पाणी

पनीर आणि पालकचे मिश्रण –  एक जुडी पालक, पनीर, एक चिरलेला कांदा, आलं लसून पेस्ट, एक चमचा धने पावडर, एक चमचा जीरे पावडर, एक चमचा लाल तिखट,  हळद, चवीनुसार मीठ, तेल किंवा बटर

पुदीना आणि कोथिंबीरची चटनी –  कोथिंबीर, पुदीना, दोन चमचे दही, चवीनुसार मीठ

कृती : 

–  प्रथम पालक बारिक चिरून घ्या

– पनीरचे छोटे छोटे कापून त्याला आलं लसून पेस्ट आणि मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवा.

– पोळीचे साहित्य एकत्र करून व्यवस्थित मळून घ्या. त्यानंतर तयार पीठाचे लहान गोळे करून त्याची पोळी लाटून घ्या.

– गरम तव्यावर तेल किंवा लोणी टाकुन पोळी दोन्ही बाजून व्यवस्थित भाजून घ्या.

– भांडयामध्ये तेल किंवा लोणी टाकुन त्यात प्रथम पनीर परतवा.

– पनीर  हलकं परतलं की त्यात चिरलेले पालक घाला. व्यवस्थित परता.

– त्यावर धने पावडर, जीरे पावडर, लाल तिखट,  हळद, चवीनुसार मीठ घाला.

– मिश्रण शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर घाला.

– चटनीचे सर्व साहीत्य मिक्सरमध्ये टाकून बारिक वाटून घ्या.

– तयार चपातीवर पनीर आणि पालकचे मिश्नण पसरवा व त्याचे रोल तयार करा

– पॅनवर तेल किंवा लोणी टाकुन ते रोल खसपूस भाजून घ्या

आपली प्रतिक्रिया द्या