
1 पॅनकार्ड महत्त्वाचे दस्तऐवज आहे. पण सायबर भामटे त्याचा गैरवापर करून कर्ज काढून तुमची आर्थिक फसवणूकही करू शकतात. तुमच्या‘पॅन’वर किती कर्ज आहे. कसे तपासावे.
2 CIBIL.com सारख्या अधिकृत पोर्टलवर पॅनकार्ड व मोबाईल नंबर टाकून ‘Free Credit Score’ तपासा. ‘Loan Accounts’ किंवा ‘Enquiries’ मध्ये तुम्हाला कर्जाची यादी दिसेल.
3 तुम्ही न घेतलेले कर्ज दिसत असेल तर घाबरू नका. आयकर विभाग, सायबर सेल, बँक किंवा लोन कंपनीकडे तक्रार करा.
4 आयकर विभागाच्या TIN NSDL अधिकृत पोर्टलवर जाऊन ‘Customer Care’ विभागात ‘Complaints /Queries’ वर क्लिक करावे व ‘PAN Fraud’ वर क्लिक करून तक्रार नोंदवा.
5 www.cybercrime.gov.in या पोर्टलवर किंवा 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवा. ज्या बँक किंवा कंपनीचे कर्ज दिसत आहे त्यांना ई-मेल करून याबाबत माहिती द्या.





























































