वादळी पावसाचा पणजीला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पणजी

आज दुपारी साडे बाराच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाचा फटका राजधानी पणजीसह राज्यातील अनेक भागांना बसला.अनेक ठिकाणी झाडे पडून मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी झाडे पडून मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.राजधानी पणजी आणि परिसरतात अग्निशामक दलाकडे सुमारे 30 कॉल आले आहेत.अग्निशामक दलाचे जवान झाडे तोडून रस्ते क्लियर करण्याचे काम करत आहेत.घरांवर झाडे कोसळून नुकसान झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत.

गोवा वेधशाळेने दुपारी 12 वाजता जारी केलेल्या पत्रका नुसार पुढील 3 तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील 3 तासात ताशी 25 किमी वेगाने मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.