शिवसेनेच्या सभेसाठी सजले पंढरपूर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता

78

सामना ऑनलाईन । पंढरपूर

सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंढरपूरमध्ये सभा आहे. त्यासाठी पंढरपूर सजले असून अवघे पंढरपूर भगवे झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासभेसाठी चंद्रभागा मैदानावर तयारी सुरू असून चार लाख हून अधिक लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सभेच्या मंडपस्थानी भगवान श्रीराम, विठ्ठल, छत्रपती महाराज आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमा उभारण्यात येणार आहेत. यासभेसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शिवसैनिक हजेरी लावणार आहेत. तर सभेत उद्धव ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता सगळीकडे लागली आहे.

या सभेसाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार तानाजी सावंत महासभेचे नियोजन करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या